कर रूपी पैसा विकास कामांसाठी वापरा
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : जनतेच्या कररूपातून जमा होणारा पैसा हा जनतेचाच असतो. त्यामुळे त्या पैशाचा वापर पूर्ण पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे नवी मुंबईच्या विकासकामांसाठी होणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालकल्याण यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये हा निधी योग्य पद्धतीने वापरला गेला, तरच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार म्हात्रे यांनी केले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीद्वारा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला उद्योजगता पुरस्कार व स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभांप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे बोलत होत्या. या वेळी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आदी उपस्थित होते.
१४ गाव परिसरात मोठ्या क्षेत्राचे भूखंड मोकळे आहेत, अशा ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणाकरिता उद्योग उभारल्यास महिलांसाठी एक नवी संजीवनी निर्माण होईल व महिलांच्या हाताला एक काम मिळेल. यासाठी महापौर व उपमहापौर यांना विनंती केली आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. समाजातील प्रत्येक महिला सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी झाली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साध्य होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

