वीज चोरांचा सुळसुळाट

वीज चोरांचा सुळसुळाट

Published on

वीजचोरांचा सुळसुळाट
जव्हारमध्ये आकडे टाकण्याचे प्रकार
जव्हार, ता. ९ (बातमीदार)ः जव्हार शहर तथा ग्रामीण भागात नवीन इमारती आणि घरांची बांधकामे सुरू आहेत. मात्र, या बांधकामांना अधिकृत वीजजोडणी मिळण्यापूर्वीच आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.
बांधकामासाठी लागणारी मिक्सर, वेल्डिंग मशीन, पाण्याची मोटारसाठी वीजचोरी केली जात आहे. विशेष म्हणजे, बेकायदेशीर वीज वापरामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वीजचोरीमुळे वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी, परिसरातील नियमित ग्राहकांना कमी व्होल्टेज किंवा वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अनधिकृत जोडण्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे उघड्यावरील वीजवाहिन्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. जव्हार शहर तथा ग्रामीण भागात अशा प्रकारच्या वीजचोरीबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. तरीही ठोस कारवाई होत नसल्याने हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने विशेष मोहीम राबवून शहरातील बांधकाम स्थळांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------------------------
जव्हार शहर अगर ग्रामीण भागांत बांधकाम सुरू असताना वीजचोरी करत असेल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सुजित नाशिककर, उपविभागीय अभियंता, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com