आंतरराष्ट्रीय महिला दिनी कष्टकरी घरेलू कामगार महिलांचा सन्मान

आंतरराष्ट्रीय महिला दिनी कष्टकरी घरेलू कामगार महिलांचा सन्मान

Published on

कष्टकरी घरेलू कामगार महिलांचा सन्मान
डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा स्तुत्य उपक्रम
डोंबिवली, ता. ९ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला. बँकेच्या केंद्रीय कार्यालयातील श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात शहरातील कष्टकरी घरेलू कामगार महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा शोभाताई आंबेरकर, कोषाध्यक्षा बेबीनंदा कांबळे, भारतीय मजदूर संघाचे ठाणे जिल्हा सचिव विलास आंबेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शोभाताई आंबेरकर यांनी संघटनेच्या इतिहासाचा आढावा घेत, महिलांनी सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच, बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचेही त्यांनी सुचवले.

कोषाध्यक्षा बेबीनंदा कांबळे यांनी बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, उच्च पदांवरील महिलांचा सन्मान नेहमीच होतो, पण अनेक कुटुंबांची जबाबदारी विश्वासाने पार पाडणाऱ्या घरकामगार महिलांचा गौरव करून बँकेने त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हा समाजासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश आहे. याप्रसंगी विलास आंबेकर यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्याची माहिती दिली. ७५ हून अधिक महिलांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला असून, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आर्थिक साक्षरतेचे धडे
केवळ सत्कारच नव्हे, तर या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या वतीने किशोर बोराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आवर्ती ठेव आणि नियमित बचतीची सवय यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सायबर घोटाळ्यांपासून सावध राहण्याचे उपाय, भविष्यातील सुरक्षिततेसाठी विमा संरक्षणाची गरज, छोटे कर्ज आणि सुलभ व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर यावरही प्रकाश टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com