ठाण्यात रंगणार ''डॉक्टर तुमच्या भेटीला''

ठाण्यात रंगणार ''डॉक्टर तुमच्या भेटीला''

Published on

ठाण्यात रंगणार ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’
लैंगिक आरोग्य आणि कौटुंबिक समस्यांवर विशेष मार्गदर्शन
ठाणे, ता. ९ : सामाजिक बांधिलकी आणि जनहिताचा वसा जपत ठाण्यामध्ये ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ठाण्यातील सहयोग मंदिर हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नामांकित हृदयविकारतज्ज्ञ डॉ. दयानंद कुम्बला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या उपक्रमात दरवेळी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केले जाते. यावेळच्या व्याख्यानासाठी ठाण्यातील सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ. अजित प्रधान यांना प्रमुख वक्ते म्हणून पाचारण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘‘वय हा फक्त एक आकडा आहे, जीवन हा आनंद व सुख आहे’’ याद्वारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमधील ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे.

व्याख्यानामध्ये मानवी जीवनातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा केली जाईल. लैंगिक आरोग्य व समस्यांबाबत समुपदेशन, लैंगिक उन्नती तंत्रे आणि वंध्यत्व, विवाहपूर्व व विवाहानंतरच्या समस्या, नातेसंबंधातील प्रश्न, कौटुंबिक संघर्ष, प्रेमभंग, समस्याग्रस्त जोडीदार आणि विश्वासघात त्याचबरोबर गे, लेस्बियन आणि बाय-सेक्सुअल संबंधांविषयीचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश
हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. बदलत्या जीवनशैलीत निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी या बहुमोल संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com