

ठाण्यात धावत्या दुचाकीला आग
दुचाकी पूर्ण जळाले, दोघे थोडक्यात बचावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : वर्तकनगर येथून मेंटल हॉस्पिटलच्या दिशेने आलेल्या एका धावत्या दुचाकीने सोमवारी (ता. ९) अचानक पेट घेतल्याची दुर्घटना समोर आली. वागळे इस्टेट परिसरातील धर्मवीरनगर येथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
वागळे इस्टेट परिसरातील मेंटल हॉस्पिटलजवळील धर्मवीरनगर येथे धावत्या दुचाकीला आग लागल्याची माहिती स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तत्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेत स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्या आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यामुळे दुचाकी वाहन पूर्णपणे खाक झाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ही दुचाकी हर्ष राबिया यांच्या मालकीची असून दुचाकीवरून दोन प्रवासी वर्तकनगर येथून मेंटल हॉस्पिटलच्या दिशेने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान वाहनातून धूर व आग दिसताच त्यांनी तत्काळ दुचाकी रस्त्याकडेला उभी केल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.