टिळक नगर पोलिसांची कारवाई; सुमारे ६.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
टिळकनगर पोलिसांची कारवाई; सुमारे ६.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) : टिळकनगर पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने केलेल्या प्रभावी कारवाईत हरवलेले ४४ मोबाईल हँडसेट शोधून काढण्यात यश मिळवले आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे सहा लाख ८० हजार रुपये असून, ते संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले.
पोलिस उपआयुक्त (झोन ६) समीर शेख, सहाय्यक पोलिस आयुक्त (देवनार विभाग) आबुराव सोनवणे तसेच टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष ढेंमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ७ मार्च २०२६ला सकाळी ११ वाजता दिवस पाळीचे पर्यवेक्षक पोलिस निरीक्षक संगम गुरसळे यांच्या उपस्थितीत सायबर पथकातील पोलिस उपनिरीक्षक राहुल राठोड, पोलिस हवालदार महाजन आणि पावसे यांनी हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना सुपूर्द केले. पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत टिळकनगर पोलिसांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

