महिला दिनानिमित्त ‘केरला स्टोरी–२’चा विशेष शो

महिला दिनानिमित्त ‘केरला स्टोरी–२’चा विशेष शो

Published on

महिला दिनानिमित्त ‘केरला स्टोरी-२’चा विशेष शो
खारघर, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागृत फाउंडेशन आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘केरला स्टोरी-२’ या चित्रपटाचा विशेष शो दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला खारघर परिसरातील पाचशेहून अधिक महिला आणि मुलींनी उपस्थित राहून चित्रपटाचा आनंद घेतला.
जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया यांनी सांगितले, की या चित्रपटातून समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुटुंबातील मुला-मुलींना योग्य संस्कार व मार्गदर्शन देणे तसेच समाजात सजगता निर्माण करणे आवश्यक असल्याचा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि समाजातील माता-भगिनी सुरक्षित राहाव्यात, या उद्देशाने हा विशेष शो आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळातही अशा सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com