

मिठागर बुजवून मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन
पुन्हा पुनर्वसनाचा वाद चिघळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मिठागर बुजवून मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धारावी प्रकल्प मुलुंडमधील खार जमीनमध्ये होणार नाही, असे आश्वासन निवडणुकीआधी
सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे मुलुंडमध्ये स्थानिकांमध्ये पुन्हा पुनर्वसनाचा वाद चिघळता आहे.
धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुलुंडमधील मिठागराची जमीन पुनर्वसनासाठी सुपीक केले जात असल्याने स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. प्रकल्प आणल्यास कडाडून विरोध करू, अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतली होती. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा वाद मुलुंडमध्ये ऐन निवडणुकीत चिघळला होता.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाव्दारे विस्थापित झालेल्यांसाठी मुलुंडमध्ये ५८.५ एकर जमीन देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजते. त्यासाठी केंद्र सरकारला ३१९ कोटी रुपये दिल्याचे स्थानिक खासदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
धारावी प्रकल्प मुलुंडमध्ये होणार नाही, असे आश्वासन निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. एक प्रकारे मुलुंडकरांची फसवणूक केली असल्याची चर्चा मुलुंडमध्ये आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
मुळात धारावी प्रकल्प येथे झाल्यास त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडेल, येथे असलेल्या सेवा सुविधांपासून स्थानिकांना वंचित रहावे लागेल. भविष्यात स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मुलुंडमध्ये होणाऱ्या धारावी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असल्याचे खासदार संजय पाटील यांनी म्हटले आहे.
ही सामान्य जनतेची फसवणूकच
धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये न करता धारावीतच करावे, यासाठी मुलुंडकरांनी अनेक आंदोलने करून याला विरोध दर्शविला आहे. तरीही याकडे दुर्लक्ष झाल्यानेही एक प्रकारे सामान्य जनतेची फसवणूक असल्याचे खासदार संजय पाटील यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.