

अस्तित्व संमेलनात सिव्हिल इंजिनिअर नितेश पाटील यांना ‘उद्योगश्री’ पुरस्कार
वाणगाव, ता. ९ (बातमीदार) : वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान आयोजित अस्तित्व संमेलन २०२६ मध्ये सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सिव्हिल इंजिनिअर नितेश प्रभाकर पाटील यांना ‘उद्योगश्री’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन या त्रिसूत्रीवर उभा असलेला त्यांचा उद्योग प्रवास आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
नितेश पाटील यांनी २०१७ मध्ये संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी प्राप्त केली. शिक्षणकाळातच पायाभूत सुविधा क्षेत्रात देशाच्या विकासात हातभार लावण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. २०१८ पासून स्वतःचा व्यवसाय सुरू करत त्यांनी गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात भक्कम पाऊल ठेवले.
सुरुवातीला छोट्या प्रकल्पांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पांपर्यंत पोहोचला आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाने लक्षणीय प्रगती साधली आहे. सध्या ते देशातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पात कार्यरत असून, आधुनिक भारताच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत मोलाचे योगदान देत आहेत. या प्रकल्पात गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे शिस्तबद्ध पालन यांना त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
‘उद्योगश्री’ पुरस्कार हा त्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमांचा, निष्ठेचा आणि प्रामाणिक उद्योग प्रवासाचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. हा गौरव केवळ वैयक्तिक नसून कुटुंबीयांचा त्याग, सहकाऱ्यांचे समर्पण आणि हितचिंतकांच्या आशीर्वादांचे फलित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यातही गुणवत्तापूर्ण कामगिरीतून राष्ट्रनिर्माणात आपला ठसा उमटवत राहण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.