अनधिकृत बांधकामाविरोधात उपोषण

अनधिकृत बांधकामाविरोधात उपोषण
Published on

अनधिकृत बांधकामाविरोधात उपोषण
कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर): कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या वडवली-मोहोने येथील अनधिकृत बांधकामाविरोधात पुकारलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्त मागे घेण्यात आले आहे. संबंधित बांधकाम निष्कासित करण्याचे पत्र प्रशासनाने दिल्याने ९ मार्च रोजी होणारे आंदोलन टळले.

वडवली हद्दीतील मौजे मोहोने येथे उभारण्यात आलेल्या एका वादग्रस्त बांधकामाबाबत सुधाबाई तिवारी यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, अनेक महिने उलटूनही माहिती अधिकारात मागवलेली माहिती न मिळणे आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नसल्याने त्यांनी ‘अ’ प्रभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

उपोषण सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने हालचाली करत तक्रारदारांना लेखी पत्र दिले. ‘अ’ प्रभाग सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिलेल्या पत्रात संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले असून, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार ११ मार्च रोजी ते पाडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहितीही देण्यात आली.

प्रशासनाची ही कार्यपद्धती गंभीर आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर किंवा उपोषणाचा इशारा दिल्यावरच प्रशासनाला जाग का येते? ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक गोविंद प्रजापती यांनी दिली.

वारंवार होणाऱ्या उपोषणांमुळे संताप
प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे आंदोलन टळले असले, तरी सामान्य नागरिकांना हक्कासाठी वारंवार उपोषणाचे मार्ग का स्वीकारावे लागतात, असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या ‘निष्क्रिय’ भूमिकेविरोधात टिटवाळा येथील नागरिकांनीही आंदोलन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com