ऐरोली माध्यमिक विद्यालयाला सलग अकराव्यांदा ‘इन्स्पायर अवॉर्ड’चा मान
ऐरोली माध्यमिक विद्यालयाला सलग अकराव्यांदा ‘इन्स्पायर अवॉर्ड’चा मान
रुद्र साळुंखे व वैष्णवी सूर्यवंशी यांची जिल्हा स्तरावर निवड
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इन्स्पायर अवॉर्ड’ स्पर्धेत ऐरोली माध्यमिक विद्यालयाने सलग अकराव्यांदा यश मिळवले आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक कल्पनांवर आधारित प्रकल्प ऑनलान सादर करावे लागतात. निवडक प्रकल्पांना भारत सरकारच्या वतीने दहा हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
यावर्षी ऐरोली माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणारा रुद्र विकास साळुंखे आणि इयत्ता दहावीतील वैष्णवी बाबू सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ प्राप्त केला आहे. या यशामुळे शाळेने सलग अकराव्यांदा हा पुरस्कार पटकावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश (भाऊ) संकपाळ, सचिव तुकाराम नांदुगडे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले. ऐरोली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर देसाई व शाळेचे पर्यवेक्षक यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक युवराज सोळसकर आणि नितीन भुयार यांचाही सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

