

म्हाडा मुंबईची लॉटरी लांबणार!
ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमसाठी हवी मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : तयार घरांची लॉटरी काढणाऱ्या म्हाडाने आता ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमअंतर्गत बांधकामाधीन असलेल्या घरांचा लाॅटरीत समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, मात्र त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाकडून लवकरच सरकारकडे जाणार आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये निघणारी म्हाडाची मुंबईतील घरांची लाॅटरी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या ज्या इमारतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत, त्या घरांचा लॉटरीत समावेश केला जातो, पण म्हाडाकडे मुंबईत तयार घरे पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये मुंबई मंडळाकडून काढल्या जाणाऱ्या लॉटरीत ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांचा समावेश केला जाणार होता. त्याबाबत म्हाडाने तयारी सुरू केली होती. त्यानुसार गोरेगाव पत्राचाळ येथील २,९५०, कन्नमवार नगर आणि प्रतीक्षा नगर येथील सुमारे ६०० घरांचा लाॅटरीत समावेश केला जाणार होता; मात्र ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमअंतर्गत बांधकामामधील घरांचा लाॅटरीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे ही मंजुरी कधी मिळणार, हा प्रश्न आहे. परिणामी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या येणाऱ्या लाॅटरीला विलंब होण्याची शक्यता आहे.
नियमावली तयार करणार
म्हाडाकडून प्रथमच प्लिंथ पूर्ण झालेल्या (बांधकामाधीन) घरांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे त्याबाबत काय नियमावली असावी, कधी आणि किती टप्प्यात पैसे भरावेत, याबाबत नियमावली (एसओपी) तयार केली जाणार आहे. त्यावर काम सुरू असून, ती लवकरच अंतिम होईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.