अल्पवयीन मुलगी बोईसरमधून बेपत्ता
अल्पवयीन मुलगी बोईसरमधून बेपत्ता
बोईस (वार्ताहर): बोईसर परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा दोन महिन्यांनंतरही ठावठिकाणा लागला नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपासात दिंरगाई होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केली आहे. हनुमान नगर-गणेश नगर परिसरातून १४ जानेवारी २०२६ रोजी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बोईसर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र दोन महिने उलटूनही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. मुलीची आई पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

