कलिंगडाची मोठी आवक : उत्पादन वाढले, भाव घसरण्याची शक्यता
कलिंगड उत्पादक चितांतुर
विक्रमगडमध्ये आवक वाढली, भाव घसरण्याची शक्यता
विक्रमगड, ता. १० (बातमीदार)ः विक्रमगड तालुक्यात कलिंगडाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, हंगामाची सुरुवात चांगली झाली असताना बाजारात अचानक आवक वाढल्यामुळे कलिंगडाचे भाव गडगडण्याच्या शक्यतेमुळे उत्पादक चिंतातुर झाले आहेत.
तालुक्यातील मळवाडा, शेळपाडा, तलवाडा, कुर्न्झे, मुहू परिसरात दरवर्षी कलिंगडाची लागवड केली जाते. या व्यवसायात स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो. त्यामुळे यंदा उत्पादन जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाच्या किरकोळ विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्या आठवडा बाजारात कलिंगडाचे ढीग लागले आहेत. विशेष म्हणजे, हंगामाच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळाला होता. मात्र, आता उत्पादन वाढल्याने बाजारात कलिंगड आकारमानानुसार २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.
-------------------------------
औषधी गुणधर्म
- आयुर्वेदानुसार कलिंगड उष्णतेवर प्रभावी फळ मानले जाते. कलिंगडाचा रस शरीराला थंडावा देतो. तसेच रक्तशुद्धी करण्यास मदत करतो. कावीळ झालेल्या रुग्णांना कलिंगडाचे सेवन लाभदायक ठरते. तसेच मूळव्याध, निद्रानाश आणि इतर विकारांमध्येही कलिंगड उपयुक्त मानले जाते.
- कलिंगडाच्या बियांपासून तयार केलेले चूर्ण सकाळी सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, असे आयुर्वेदात आहे. मानसिक दुर्बलता, चेहऱ्यावरील काळे डाग आणि त्वचेच्या समस्या यावरही कलिंगड फायदेशीर ठरते. चविष्ट व आरोग्यदायी असल्याने फळाला विशेष महत्त्व आहे.
----------------------------
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कलिंगड लागवड झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळाला. मात्र, उत्पादन वाढल्याने बाजारात मोठी आवक झाली असून भाव घसरण्याची शक्यता आहे.
- अमित भावर, कलिंगडविक्रेता, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

