वसई-विरारकरांसाठी उद्यापासून पर्वणी
वसई-विरारकरांसाठी उद्यापासून पर्वणी
‘कोकण सरस’ला भेट देण्याचे आयुक्तांचे आवाहन
विरार, ता. १० (बातमीदार)ः पालघर जिल्हा परिषद अंतर्गत उमेद अभियान, वसई-विरार शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण सरस महोत्सव’ विरार (पश्चिम) येथे उद्यापासून सुरू होणार आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
विरार पश्चिमेतील जकात नाका परिसरातील म्हाडा मैदानावर १२ ते १६ मार्च यादरम्यान कोकण सरस कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमात महिला बचत गटातील महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे, हस्तकला, कलाकुसरीचे, स्वादिष्ट पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. या कार्यक्रमाला वसई-विरारकरांना भेट द्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे. या वेळी स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर मनोज रानडे, सर्व स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव, जिल्हा परिषद पालघर व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------
महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंना, पदार्थांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करणे, हा मुख्य उद्देश असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी कोकण सरसला भेट द्यावी. तसेच आकर्षक वस्तूंची, खाद्यपदार्थांची खरेदी करून प्रोत्साहन द्यावे.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

