रासायनिक घनकचऱ्याचा बेकायदा साठा
रासायनिक घनकचऱ्याचा बेकायदा साठा
तारापूर औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणाला गंभीर धोका
बोईसर, ता. १० (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात परिसरातील रासायनिक घनकचरा, प्लॅस्टिक आणि विविध औद्योगिक अवशेषांची बेकायदा साठवणूक केली जात आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
धोडीपूजा, चेतना गल्ली, अवधनगर, सालवड मान, वारंगडे तसेच औद्योगिक क्षेत्रातील काही ठिकाणी रासायनिक घनकचऱ्याच्या गोण्या, प्लॅस्टिक, विविध औद्योगिक अवशेष खुलेपणाने टाकून ठेवले जात आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असताना काही जण नियमांना हरताळ फासत हा धोकादायक प्रकार सर्रासपणे करत असल्याची चर्चा परिसरात आहे. या साठवणुकीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येणारे हजारो कामगार तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने लक्ष देऊन अनधिकृत कचरा साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
-----------------------
तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक घनकचऱ्याची अनधिकृत साठवणूक गंभीर प्रकार असून, परिसरातील पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
-रूपेश पाटील, पर्यावरणप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

