

बदलापूर, ता. १० (बातमीदार) : ५५व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कल्याण विभाग आणि बदलापूर इंडस्ट्रीज वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धोकादायक रसायनाची हाताळणी व मटेरियल सेफ्टी डेटा शीट’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग पार पडला.
प्रशिक्षण कार्यक्रमात धोकादायक रसायनांचा वापर करताना घ्यावयाची आवश्यक खबरदारी, सुरक्षित हाताळणीच्या पद्धती, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाला बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमधील सुमारे ७५हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. प्रशिक्षण वर्गात औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले आणि रसायन हाताळणीचा व्यापक अनुभव असलेले तज्ज्ञ मार्गदर्शक राजेंद्र पयनाईक यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम सहसंचालक सुरेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपसंचालक नितीन गजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. असोसिएशनचे अध्यक्ष कुशल जैन अध्यक्षस्थानी होते, तर डी. के. फार्मकेम प्रा. लि. चे संचालक राकेश बक्षी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बिवा संस्थेचे सदस्य शक्ती रामकृष्णन आणि हेमंत पारसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.