कोपरी ब्रिजवर ऑईल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम

कोपरी ब्रिजवर ऑईल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम

Published on

कोपरी ब्रिजवर ऑइल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम

ठाणे : ठाणे-मुंबई मार्गावरील कोपरी ब्रिज येथे सोमवारी (९ मार्च) रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, सांडलेल्या ऑइलवर माती पसरवली आणि तो रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत केला. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
..............

मुंब्रा देवी मंदिराजवळ डोंगरावरील जंगलाला आग
ठाणे : येऊरच्या जंगलाला आग लागल्याची घटना ताजी असताना, मुंब्रा बायपास रोडवरील मुंब्रा देवी मंदिराजवळील डोंगरावरील जंगलात सोमवारी (९ मार्च) रात्री सुमारे सवाआठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी घेतली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुमारे ९:५० वाजण्याच्या सुमारास त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
.....................

दिव्यात १४ महिन्यांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरीला

ठाणे : दिवा परिसरात १४ महिन्यांच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदार प्रिया रविराज बोटले (वय ३६) या दिवा, खर्डी गाव येथे राहणाऱ्या असून, त्या ८ मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या आई आणि मुलीसह दिवा स्थानक परिसरात साडी खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून त्या रात्री १० वाजता घरी परतल्या. घरी आल्यानंतर मुलीच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट हरवल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
.......

महागडी कार चोरीला

ठाणे : वर्तकनगर परिसरातून महागडी कार चोरी झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी समता नगर येथील नवनाथ बुगडे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ८ मार्च रोजी रात्री तक्रारदार यांनी कार समता नगर येथील ऑफिससमोर पार्क केली होती. ९ मार्च रोजी पहाटे सुमारे ५ वाजता मोबाईलमधील जीपीएसवर कारचे लोकेशन पनवेल (जि. रायगड) परिसरात दिसून आले. त्यानंतर ऑफिससमोर जाऊन पाहिले असता ती कार तेथे आढळून आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com