नेने महाविद्यालयात विद्यार्थिनी साठी क्रीडा व मानसशास्त्र यावर आधारित कार्यशाळा

नेने महाविद्यालयात विद्यार्थिनी साठी क्रीडा व मानसशास्त्र यावर आधारित कार्यशाळा
Published on

नेने महाविद्यालयात खेळाचे महत्त्व व व्यक्तिमत्व विकास विषयावर कार्यशाळा
पेण, ता. १० (बातमीदार) ः नेने महाविद्यालयातील महिला विकास केंद्र आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी खेळाचे महत्त्व व व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळा नुकतेच पार पडली. या कार्यशाळेसाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि सह्याद्री मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक मृण्मयी पाठक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
संस्थेचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप, आयक्यूएसी प्रमुख बी. एम. शिकारे, महिला विकास केंद्राचे प्रमुख प्रा. ए. झेड. आझमी, डॉ. हेमलता सावंत, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विनोद भाबड, हिंदी विभाग प्रमुख डॉ. देविदास बामणे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. सदानंद धारप यांनी खेळाचे महत्व व त्याचे विविध पैलू स्वतःच्या क्षमताशी परिचय करून देत सर्वोत्तम कामासाठी उद्योग प्रकरणे हेच या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या मृण्मयी पाठक यांनी विद्यार्थिंनीशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी गिर्यारोहणाबद्दल आपले अनुभव सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com