आरडीसीए तर्फे महिला रायगड प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन

आरडीसीए तर्फे महिला रायगड प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन

Published on

आरडीसीएतर्फे महिला रायगड प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन

पोयनाड, ता. १० (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, महिला रायगड प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मार्च व एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध क्रिकेट मैदानांवर ही महिला प्रीमियर लीग आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटचा दर्जा उंचावणे तसेच जिल्ह्यातील शहरी भागासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना क्रिकेट खेळासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या खेळाला चांगल्या दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असणार आहे. महिला क्रिकेटपटूंना अधिक खेळाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि जिल्ह्यातील अनेक प्रतिभावान महिला खेळाडू पुढे याव्यात यासाठी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला खेळाडूंनी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत खेळाडूंनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
महिला रायगड प्रीमियर लीग २०२६ साठी नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आली असून, रायगड जिल्ह्यातील सर्व महिला क्रिकेटपटूंनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आरडीसीएतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या नोंदणी विषयी अधिक माहितीसाठी जयंत नाईक (अलिबाग), देवा पाटील (पेण), योगेश पवार (पेण), नाना मयेकर (उरण), महेंद्र भातिकरे (रोहा), आवेश चीचकर (महाड), रोहित कार्ले (खोपोली), संदीप जोशी (अलिबाग), रोहित काळे (माणगांव) आणि विनय पाटील (पनवेल खारघर) यांच्याशी संपर्क करावा.
तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com