आर्थिक व्यवहारांचे विद्यार्थ्यांना धडे

आर्थिक व्यवहारांचे विद्यार्थ्यांना धडे

Published on

आर्थिक व्यवहारांचे विद्यार्थ्यांना धडे
पालघर, ता.१० ः शालेय जीवनातच आर्थिक व्यवहारांचे धडे आणि दैनंदिन जीवनातील व्यवहार समजावे, या उद्देशाने विद्यार्थिवर्गांसाठी आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा वेवूर येथे बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्यांचे दर्शन उपक्रमात पाहायला मिळाले. आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी विविध खाद्यपदार्थ ठेवले होते. विद्यार्थ्यांनी परसबागेत स्वतःपिकवलेला, विक्रीसाठी ठेवलेला सेंद्रिय भाजीपाला कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विद्यार्थीच नव्हे, तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक संघाचे सदस्य आणि शाळेतील प्रशिक्षणार्थी यांनीही मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवला. पालकांनी विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले. या प्रात्यक्षिक अनुभवातून मुलांना नफा-तोटा, हिशोब आणि ग्राहक संवाद या विषयांचे थेट शिक्षण मिळाले. या उपक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका अजनी राऊत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com