गंजाडच्या विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे

गंजाडच्या विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे

Published on

गंजाडच्या विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे
परसबागेतील भाजीपाल्याची आठवडा बाजारात विक्री
कासा, ता.१० (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील गंजाड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परसबागेत भाज्यांची लागवड करून त्या आठवडा बाजारात विक्री केली जात आहे. विद्यार्थ्यांमधील व्यवहारज्ञान वाढवणाऱ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
तीन महिन्यांपासून शाळेच्या परसबागेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वांगी, टोमॅटो तसेच पालेभाज्यांमध्ये पालक, शेपू, कोथिंबीर, मिरची, मेथी आणि दुधी यांसारख्या भाज्यांची लागवड केली. या भाजीपाल्याच्या लागवडीसाठी शेणखताचा वापर करण्यात आला. भाज्यांची देखभाल, पाणी देणे आणि स्वच्छता यामध्येही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच तयार झालेल्या टोमॅटो, वांगी, इतर भाज्यांपैकी काही भाजी शाळेच्या दुपारच्या मध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात आली, तर उरलेल्या भाज्या स्थानिक आठवडा बाजारात विकण्यात आल्या. या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा उपयोग शाळेसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
-------------------------------
कौतुकाची थाप
आठवडा बाजारात विक्री करताना विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे महत्त्व समजले तसेच अभ्यासाबरोबरच परसबाग तयार करणे, स्वच्छता राखणे आणि श्रमाचे मूल्य समजून घेण्याचा अनुभवही मिळाला. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे गंजाडचे सरपंच अभिजीत देसक यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com