रजोनिवृत्ती विषयावर कार्यशाळा
रजोनिवृत्ती विषयावर कार्यशाळा
जव्हार येथे ३६० परिचारिकांना प्रशिक्षण
पालघर, ता.१० ः जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात रजोनिवृत्ती विषयावर कार्यशाळेत ३६० परिचरिकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई संलग्नित निरंतर व्यावसायिक विकास कार्यक्रमांतर्गत, जिल्हा रुग्णालय पालघर, ग्रामीण रुग्णालय आणि सूर्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पालघरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जव्हारचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कावळे आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या परीक्षक डॉ. दिपाली गिजरे उपस्थित होते. रजोनिवृत्तीसारख्या महत्त्वाच्या विषयावर परिचारिकांनी अद्ययावत ज्ञान घेणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यशाळेत रजोनिवृत्तीच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रुपाली म्हसकर (अधिसेविका, पालघर) यांनी मेनोपॉज (रजोनिवृत्ती) प्रक्रिया, शारीरिक बदल, कविता चव्हाण (सहाय्यक अधिसेविका, जव्हार) यांनी रजोनिवृत्तीसाठी विशेष क्लिनिकचे आयोजन केले. तर प्राचार्य अक्षता राऊत यांनी रजोनिवृत्तीमुळे उद्भवणारे आजार आणि प्रतिबंधात्मक काळजी यावर मार्गदर्शन केले. सुनीता इंगळे आणि सुवर्णा पांढरे यांनी मानसिक आरोग्य आणि या काळात कुटुंबाची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

