मद्यधुंद चालकाचा धिंगाणा
मद्यधुंद दुचाकीस्वाराचा भररस्त्यात धिंगाणा
वाहतूक पोलिसांना शिवीगाळ
कल्याण, ता. १० (बातमीदार) : मद्याच्या नशेत सुसाट दुचाकी चालवत स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाने कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत मोठा धिंगाणा घातला. सोमवारी (९ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास श्री मलंगगड-चिंचपाडा १०० फुटी रोडवर ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी विनय तिवारी नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे वाहतूक पोलिस चिंचपाडा परिसरात आपली ड्युटी बजावत होते. या वेळी एका वाइन शॉपसमोरून आरोपी विनय तिवारी आपल्या स्कूटरवरून जात असताना तो पूर्णपणे नशेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सहकार्य करण्याऐवजी भररस्त्यात पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रस्त्यावरील गोंधळानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चक्कीनाका वाहतूक पोलिस शाखेत नेले. मात्र, तेथेही आरोपीचा अवतार कमी झाला नाही. त्याने उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांशी अत्यंत उद्धटपणे वर्तन केले आणि पुन्हा शिवीगाळ केली.
त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत.
स्थानिकांची भीती
भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो. अशा बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

