पाणीपुरवठ्याची जबाबदारी ‘सिडको’वर

पाणीपुरवठ्याची जबाबदारी ‘सिडको’वर

Published on

खारघर, ता. १० (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांची मागणी पूर्ण करून एमआयडीसीकडून तळोजा वसाहतीत प्रतिदिन सहा ते सात दलली पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. खारघर, तळोजा फेज-१ व फेज-२ या सिडको क्षेत्रातील ग्राहकांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी ही सिडकोची असल्याचे तळोजा एमआयडीसीकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्राप्त झाल्यानंतर लेखी उत्तर दिले आहे.

इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीचे पदाधिकारी, तळोजा येथील राजीव सिन्हा यांनी तळोजा वसाहतीमधील पाणी समस्येसंदर्भात ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार केली होती. त्याची दखल घेवून तळोजा एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश गाधडे यांनी लेखी पत्र दिले आहे. तळोजा वसाहत हे जलवाहिनीच्या टॅपिंग पॉईंट शेवटच्या टोकाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सिडकोसाठी सरासरी सहा ते सात दलली प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांची मागणी पूर्ण केल्यानंतर पाणी सिडकोपर्यंत पोहोचते. त्यानंतर तळोजा फेज-१ व फेज-२ या सिडको क्षेत्रातील ग्राहकांसाठी पाणी वितरण जाळे व व्यवस्था ही सिडकोची जबाबदारी असल्याचे लेखी पत्र एमआयडीसीकडून राजीव सिन्हा यांना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com