भैरव विद्यालयाची उत्तुंग भरारी

भैरव विद्यालयाची उत्तुंग भरारी
Published on

भैरव विद्यालयाची उत्तुंग भरारी, तीन विद्यार्थ्यांचा पुरस्काराने गौरव

मुंबई, ता. १० : घाटकोपर येथील भैरव विद्यालयाच्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘इन्स्पायर अवॉर्ड - मानक’ या स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, सर्व स्तरावर त्यांच्या या यशाचा गौरव होत आहे.
या यशाचे मानकरी ठरलेले साक्षी संतोष कोकरे (इयत्ता ७वी), सार्थक दीपक गुरव (इयत्ता १०वी) आणि स्वराज सर्जेराव साठे (इयत्ता १०वी) या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या अनोख्या नवकल्पनांच्या जोरावर हे यश संपादन केले. या निवडीबद्दल प्रत्येकी १० हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांना त्यांच्या वैज्ञानिक प्रतिकृती अधिक प्रगत करण्यासाठी वापरता येणार आहे.
या यशात शाळेच्या शिक्षिका मिताली महेंद्र तांबे यांचे मोलाचे योगदान लाभले असून, त्यांच्या तांत्रिक आणि कल्पक मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प प्रभावीपणे सादर केले.
विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या राणे, शाळेचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र घोरपडे, संस्थापक विश्वस्त वसंत चव्हाण आणि विश्वस्त शशी काळभोर यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम शाळा सातत्याने करीत आहे. त्याचेच हे फळ आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com