६० महिला कर्मचारी पुन्हा सेवेत

६० महिला कर्मचारी पुन्हा सेवेत

Published on

६० महिला कर्मचारी पुन्हा सेवेत
जव्हारमधील ‘धुलाई आंदोलना’ला अखेर यश
जव्हार, ता.१० (बातमीदार)ः जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने विविध आश्रमशाळांमध्ये २० वर्षे सेवा देणाऱ्या ६० महिलांना कोणतीही पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी केले होते. याविरोधात महिलांनी केलेल्या ‘धुलाई आंदोलन’ पडसाद विधिमंडळात उमटले असून
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भूमीपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता राजीव गांधी मैदानात महिलांनी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करतप्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला, आंदोलनस्थळी महिलांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे, चादरी धुऊन प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाची दखल घेत विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
यामुळे सर्व महिलांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच गेल्या सात ते आठ महिन्यांपासून थकीत असलेले वेतनही तातडीने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या ‘धुलाई आंदोलना’ला यश मिळाले आहे.
------------------------
‘सकाळ’चे कौतुक
या आंदोलनाचे नेतृत्व भूमीपुत्र एल्गार संघटनेचे सरचिटणीस नवनाथ भोये, कार्याध्यक्ष सुनील लोणे आणि अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केले. तसेच मार्क्सवादी लेनिनवादी पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. यावेळी आंदोलकांनी ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याचे देखील कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com