उरणला आठ वर्षांनंतर मिळणार सभापती

उरणला आठ वर्षांनंतर मिळणार सभापती

Published on

उरण, ता. १०(वार्ताहर) : महिनाभरापूर्वी पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर आता उरणमध्ये सभापती, उपसभापती या पदांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर उरणला सभापती मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. सभापती पदाची निवड उद्या (ता. ११) होणार असल्याने विविध पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

यंदाच्या निवडणुकीत उरण पंचायत समितीत महाविकास आघाडीचे एकूण सात सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे निर्मला घरत, प्रियंका मढवी, प्रारंभी गावंड, महेश म्हात्रे असे चार सदस्य, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कविता पाटील, दीपक भोईर आणि परेश ठाकूर असे तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती पदासाठी महाविकास आघाडीमध्येच चुरस निर्माण झाली आहे.

मविआमध्ये संख्याबळाच्या आधारावर शेकापकडे सर्वाधिक सदस्य असल्याने सभापती पदावर त्यांचा पहिला दावा मानला जात आहे, मात्र ठाकरे गटाकडूनही सभापती पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आघाडीमध्ये नेमके पहिले प्राधान्य कोणाला दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभापती व उपसभापती या पदांच्या निवडीसाठी पंचायत समितीची विशेष बैठक बुधवारी बोलावली आहे. त्यामुळे उरण पंचायत समितीतील सत्तासमीकरणे कशी जुळतात आणि सभापती पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विकासकामांना गती मिळणार
आठ वर्षांनंतर उरण पंचायत समितीला सभापती मिळणार असल्याने स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी सभापती निवडीकडे उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com