नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघात विविध कार्यक्रम

नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघात विविध कार्यक्रम

Published on

नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघात विविध कार्यक्रम
कविता, नाटिका, नृत्य आणि स्पर्धांमधून महिला सन्मानाचा संदेश
नवीन पनवेल, ता. १० (बातमीदार) : नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संघाचे अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत डांगरे आणि खजिनदार मेहेंदर्ग यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सचिव विकास वाणी यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन वर्षा जोशी यांनी केले. कल्पना पाटील यांनी प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी रेखाटली होती.
कार्यक्रमात विजया करंडे, वर्षा मेहेंदर्गे, शुभांगी कुलकर्णी आणि विलास चव्हाण यांनी महिला दिनाशी सुसंगत स्वलिखित कविता सादर केल्या. विजया करंडे दिग्दर्शित ‘टूर निघाली’ ही नाटिका महिला कलाकारांनी सादर केली. जया वझे यांनी ‘झाला आनंद आली बहार’ या गाण्यावर नृत्य सादर केले, तर शोभा पराडे यांनी ‘आले विसाव्याचे क्षण’ हे गीत सादर केले. सतीश व्यवहारे यांनी ‘पुरुषांच्या दृष्टिकोनातून महिलांचे महत्त्व’ या विषयावर विचार मांडले. मंजूषा तळणीकर यांच्या संकल्पनेतून खाद्यजत्रेलाही सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
महिला सभासदांसाठी झालेल्या रांगोळी स्पर्धेत संपदा बेहरे प्रथम, वर्षा मेहेंदर्गे द्वितीय आणि प्रगती निडारकर तृतीय ठरल्या. मराठी नाट्यसृष्टीशी संबंधित स्मरणशक्ती स्पर्धेत अंजली अंधारे प्रथम, सुनीता रास्ते द्वितीय तर वर्षा मेहेंदर्गे तृतीय ठरल्या. कार्यक्रमात प्रमोद कोरडे, भानुदास व्यास, घनश्याम आहुजा, पद्मनाभ भागवत आणि श्रीकांत देशपांडे यांनी महिलांच्या गौरवार्थ घोषवाक्ये सादर केली, तर आशा व्यास व आबा टिपणीस यांनी संघातील दिवंगत कर्तृत्ववान महिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com