जबरी चोरी करणाऱ्या चोराला चार वर्षांचा कारावास

जबरी चोरी करणाऱ्या चोराला चार वर्षांचा कारावास
Published on

जबरी चोरी करणाऱ्या चोराला चार वर्षांचा कारावास
ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) ः रिक्षात बसलेल्या महिलेची पर्स जबरदस्तीने खेचून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी चार वर्षांची सक्त मजुरी आणि दोन हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. श्रेयस पडवळ असे त्याचे नाव आहे. कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने सहा वर्षांपूर्वी हा गुन्हा केला होता. त्यावर मंगळवारी अंतिम सुनावणी झाली.
कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्फूर्ती लक्ष्मीनारायण ही महिला रिक्षामधून प्रवास करीत होती. त्या वेळी श्रेयस उर्फ बॉडी सुजित पडवळ याने तिच्याकडील पैशांची पर्स जबरदस्तीने हिसकावून पळ काढताना रंगेहाथ पकडला गेला होता. त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठवून दिले असता सरकारी वकील प्रमिला चव्हाण-जाधव यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद करून न्यायालयात श्रेयसच्या विरोधात भक्कम साक्षी पुरावे मांडले असता न्यायालयाने त्याला चार वर्षांचा सक्त कारावास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक टी. एन. डुंबरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर कोर्ट ड्युटी अधिकारी म्हणून हवालदार विजय सानप, पोलिस शिपाई नितेश कुंभार, समन्स ड्युटी पोलिस हवालदार उत्तम जंगले, पोलिस हवालदार मोहनदास धिंदळे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com