

महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात १३ महिला पोलिसांचा गौरव
महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांशी थेट संवाद; समस्या जाणून घेत मार्गदर्शन
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तर्फे महिला पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी विशेष संमेलन घेण्यात आले. कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला पोलिसांचा गौरव करण्यात आला.
या उपक्रमाची संकल्पना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची होती. यावेळी पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील, तिरुपती काकडे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विविध पोलीस ठाणे व शाखांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी अशोक नंदिकुरले यांच्या ‘हसरी मैफिल’ या सादरीकरणाने उपस्थितांना विशेष आनंद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.