‘चला खेळ खेळूया पैठणीचा’ उपक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग खारघर,ता.10 (बातमीदार) : शालेय जीवनात विविध खेळ खेळत असे,मात्र महिला दीना निमित्त ''चला खेळ खेळूया पैठणीचा'' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर विविध खेळ खेळण्याचा आनंद घेत असताना,विविध खेळ खेळून पैठणी प्राप्त झाल्यामुळे पैठणीचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना प्रभाग क्रमांक सहा मधील महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना दिसून आले. यावेळी विजेत्या महिलांना मोहिनी विक्रांत पाटील आणि नगरसेविका स्नेहल डमाळे यांच्या हस्ते विजेत्या महिलाना पैठणी देवून सन्मान करण्यात आले. वास्तुविहार सेलिब्रेशन परिसरात वास्तव्यास असलेल्या माजी नगरसेविका संजना कदम आणि नगरसेवक समीर कदम यांच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त प्रभागातील महिलांसाठी ''चला खेळ खेळूया पैठणीचा'' तसेच विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने प्रभागातील महिलांनी विविध खेळ खेळून खेळाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी संजना कदम यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाचे महत्व सांगितले. तर नगरसेवक समीर कदम यांनी पालिकेच्या माध्यमातून तसेच आमदार विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून महिलेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान मोहिनी पाटील यांनी राज्यात भाजप सत्ते वर असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रयत्नामुळे लाडकी बहीण ,लखपती दीदी हे उपक्रम सुरु असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी समीर आणि संजना कदम हे दाम्पत्य आपल्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी चला खेळ खेळूया पैठणीचा खेळाच्या मानकरी ठरलेल्या मंगल गरजे , सोनी कलवार, छाया बैरागी ,मती वेलणकर ,संगीता खोपडेयांच्यासह इतर स्पर्धेतील विजेत्यांना मोहिनी विक्रांत पाटील आणि नगरसेविका स्नेहल डमाळे,संजना कदम यांच्या हस्ते विजेत्याना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले
‘चला खेळ खेळूया पैठणीचा’ उपक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
खेळांच्या माध्यमातून पैठणी जिंकत महिलांनी व्यक्त केला आनंद
खारघर, ता. १० (बातमीदार) :
महिला दिनानिमित्त खारघरमधील वास्तुविहार सेलिब्रेशन परिसरात ‘चला खेळ खेळूया पैठणीचा’ या उपक्रमातून महिलांनी विविध खेळांचा आनंद घेत पैठणी जिंकत आपले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. शालेय जीवनात खेळलेले विविध खेळ अनेक वर्षांनंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
हा उपक्रम माजी नगरसेविका संजना कदम आणि नगरसेवक समीर कदम यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. यावेळी मोहिनी विक्रांत पाटील आणि नगरसेविका स्नेहल डमाळे यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात प्रभागातील महिलांनी विविध खेळांत सहभाग घेतला. ‘चला खेळ खेळूया पैठणीचा’ या स्पर्धेत मंगल गरजे, सोनी कलवार, छाया बैरागी, मती वेलणकर आणि संगीता खोपडे या मानकरी ठरल्या. यावेळी उपस्थित महिलांना महिला दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

