महसूल समाधान शिबिरास प्रतिसाद
महसूल समाधान शिबिरास प्रतिसाद
मुरूड तालुक्यातील शिघ्रे येथे ७५१ दाखल्यांचे वाटप
मुरूड, ता. १० (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला मुरूड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मुरूड महसूल मंडळातील पंचक्रोशीतील नागरिकांना तहसीलदार आदेश डफळ यांच्या हस्ते ७५१ विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील सात-आठ गावांमधील महिला व पुरुष मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते. या वेळी व्यासपीठावर तहसीलदार आदेश डफळ, नायब तहसीलदार संजय तवर, सरपंच गुलाब वाघमारे, उपसरपंच हाफिजू कबले, तेलवडेचे उपसरपंच नीलेश तांबडकर, ग्रामपंचायत सदस्य रुबीना बिरवाडकर, अमोल पाटील तसेच सावलीच्या उपसरपंच मंदा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र आदी नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखल्यांचा समावेश होता.
तहसीलदार आदेश डफळ यांनी मार्गदर्शन करताना महसूल विभागातील नव्या कायद्यानुसार नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी असे शिबिर उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. अकृषक परवानगी, डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी ग्राम महसूल अधिकारी, तलाठी वर्ग, महसूल कर्मचारी तसेच पंचायत समिती विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. या अभियानाचा दुसरा टप्पा १४ मार्च रोजी नांदगाव मंडळातील माळी समाज हॉल येथे होणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

