

फुंडे विद्यालयात स्त्री सशक्तीकरणाचा उत्सव उत्साहात
उरण, ता. १० : रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बी. बी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ११६वा आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, उपमुख्याध्यापिका एस. डी. थोरात, पर्यवेक्षिका एस. एम. बाबर, एस. एस. पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस. डी. म्हात्रे, वरिष्ठ लेखनिक नितीन म्हात्रे, नवनीत ठाकूर उपस्थित सेवकवृंदाच्या हस्ते त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
स्त्री आहे शक्ती, स्त्री आहे मान
तिच्यामुळे उजळतो घराचा प्रत्येक कोपरा जाण
तिच्या कष्टाने फुलते जीवनाचे रान
महिलादिनी करू या तिचा सन्मान.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षिका, भगिनींना पुष्प व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी श्रेया शिंदे, आर्या शिर्के, कांचन घुगे आणि श्रवण गोरे या विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाने श्रेष्ठ अशा थोर महिलांची माहिती सांगितली. त्यानंतर सुहानी प्रजापती या विद्यार्थिनीने ‘हसत मुखाने गीत ही आले आज हो तुमच्या पुढे, या नारीशक्तीचे स्वागत करू या शब्दफुलांचे सडे’ या गीताचे सुमधुर आवाजात सादरीकरण केले. संगीतसाथ उपशिक्षक पी. ए. पाटील यांनी दिली.
त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर. जी. शेळके यांनी ‘नका मारू बाबा मला काही नाही मागत’ या हृदयस्पर्शी कवितेचे सादरीकरण केले. प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक एस. डी. म्हात्रे व उपशिक्षिका के. एम. जितेकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व विशद केले. आजच्या वैज्ञानिक प्रगत, स्पर्धेच्या युगात महिलांनी शिक्षण, क्रीडा, विज्ञान, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला नवी दिशा दिली आहे. केवळ ८ मार्चपुरते मर्यादित न राहता वर्षाचे ३६५ दिवस स्त्रीच्या कर्तृत्वाचा आदर व्हायला हवा. याप्रसंगी महिलांचा आदर करण्याचे आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील यांनी केले. आभार उपमुख्याध्यपिका एस. डी. थोरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवकवृंदाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.