महिलांचा सन्मान कार्यक्रम उत्साहात

महिलांचा सन्मान कार्यक्रम उत्साहात
Published on

महिलांचा सन्मान कार्यक्रम उत्साहात
विरार, ता. १० (बातमीदार) : वसई कला प्रतिष्ठान आणि डॉ. शिरीशकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे ओचित्य साधून लायब्ररी हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे रंगवेध प्रस्तुत, मल्हार म्युझिक निर्मित ‘गीत एक, दो आवाजें’ हा हिंदी चित्रपटांतील गाजलेल्या फिमेल ड्युएट गाण्यांचा अनोखा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची संकल्पना, संशोधन आणि संहितालेखन विलास पागार व संगीत संयोजन सुशील पेंढारी यांचे होते. यामध्ये सुप्रसिद्ध गायिका वैशाली फडके, पद्मजा पाटील, पल्लवी नेरकर, डॉ. रेणुका पाटील सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे निवेदन सुमित्रा देवधर, दीपाली शहाणे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विजय शिरीशकर, डॉ. प्रवीण क्षीरसागर, पंडित नरेंद्र कोठंबीकर, विदुषी अनिता गोस्वामी, वसई कला-क्रीडाचे उपाध्यक्ष संतोष वळवईकर, सन्मानमूर्ती अनिता म्हात्रे आणि माजी नगरसेविका सीमा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमात महिला दिनाचे औचित्य राखून विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये श्रमिक महिला संघाच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जयश्री सामंत, गेली ३५ वर्षे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून आप्पांच्या माध्यमातून अनेकांना शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशा निरनिराळ्या प्रकारे सहकार्य करून समाजसेवा करणाऱ्या, विशेषतः कोरोना काळात अनेकांचा जीव वाचविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अनिता म्हात्रे आणि गेली २५ वर्षे फोटोग्राफीमध्ये कार्यरत राहून चित्रकला व पाककलेत निष्णात असलेल्या आणि नुकताच सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे त्यांचे चित्रप्रदर्शन मांडणाऱ्या चित्रकार ज्योती मलिक यांचा सन्मान माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत डॉ. विजय शिरीशकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांचा सन्मान आणि डॉ. विजय शिरीशकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस वर्षपूर्तीनिमित्त हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॅाड्रिग्ज, माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव आणि कला-क्रीडाचे कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळी, सरचिटणीस केवल वर्तक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com