उन्हाळ्याच्या झळांत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय

उन्हाळ्याच्या झळांत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय

Published on

उन्हाळ्याच्या झळांत पक्ष्यांसाठी ‘मायेचा ओलावा’
टिटवाळ्यात योगदान फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
टिटवाळा, ता. ११ (वार्ताहर) : वाढत्या उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटत असून, मानवासोबतच मुक्या पाखरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, टिटवाळ्यातील योगदान फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने पक्ष्यांसाठी मातीच्या पाण्याच्या भांड्यांचे (वॉटर पॉट) वाटप करून एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष मदन मोहन चव्हाण यांनी आपला मुलगा देवेश चव्हाण याच्या वाढदिवसानिमित्त फालतू खर्च टाळून हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला. या वेळी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी आपल्या घराची गच्ची, खिडकी किंवा बाल्कनीमध्ये ही भांडी ठेवावीत, जेणेकरून तहानलेल्या पक्ष्यांना सहज पाणी मिळेल. आपल्या छोट्याशा कृतीतून निसर्गाचे रक्षण होऊ शकते. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, ती थांबवणे हे आपले कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया योगदान फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मदन मोहन चव्हाण यांनी दिली.

संस्थेचे सामाजिक योगदान
योगदान फाउंडेशन ट्रस्ट केवळ पाणीवाटपच नव्हे, तर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती आणि गरजू घटकांना मदत अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमामुळे टिटवाळा परिसरातून संस्थेचे कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनाचा एक सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये :
प्लॅस्टिकऐवजी मातीच्या भांड्यांचा वापर, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते.
वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन समाजोपयोगी कार्यावर भर.
अनेक रहिवाशांनी स्वतःहून आपल्या परिसरात अशी पाण्याची सोय करण्याचा संकल्प केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com