

माकपचा शिमगा मोर्चा धडकला
मस्तान नाकापासून विक्रमगडपर्यंत पायी आंदोलन
विक्रमगड, ता.११ (बातमीदार)ः मनोरच्या मस्तान नाका येथून विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर माकपचा शिमगा मोर्चा अखेर धडकला. यावेळी आंदोलकांनी तब्बल २३ किलोमीटरटचा पायी प्रवास करत विविध मागण्यांचे निवेदन दिले.
पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांची५२ कोटी ४५ लाख रुपयांची थकीत मजूरी तातडीने मिळावी, विश्वासू भावांच्या बहुदेशी हॉलला तातडीने घरपट्टी आकारणी करा, बोगस मस्टर काढून भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवकावर तातडीने कारवाई करा, घरकुल धारकांचे थकीत हप्ते तातडीने द्या, प्रत्येक गरजू आदिवासींना अंत्योदय योजणेप्रमाणे ३५ किलो धान्य द्यावे, प्रलंबित वनदावे तातडीने नावी करा, तसेच तालुक्यातील दुबार शेताच्या शेतीमालाला (गवार, चवळी, मिरची, भेंडी) योग्य भाव मिळावा, विविध प्रकल्पाने बाधित शेतकऱ्यांना आधी योग्य मोबदला द्या मगच काम चालू करा, आदिवासी पाड्यात तातडीने वीज जोडणी द्या, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.