श्वानांना प्राणिमित्रांकडून जीवदान

श्वानांना प्राणिमित्रांकडून जीवदान

Published on

श्वानांना प्राणिमित्रांकडून जीवदान
वाढत्या उन्हामुळे अन्नाच्या शोधात भटकंती
कासा, ता.११ (बातमीदार)ः वाढत्या उन्हामुळे मोकाट प्राणी मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी, अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या अशाच दोन श्वानांचा जीव प्राणीमित्रांनी वाचवला आहे.
कासा स्मशानभूमी परिसरातील नदीकिनारी सोमवारी एक भटका श्वा अशक्तपणामुळे विव्हळ अवस्थेत पडलेला आढळून आला. अन्नाविना कृश झालेल्या श्वानाची अवस्था अत्यंत दयनीय होती. या घटनेची माहिती प्राणिमित्रांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सोबत प्राण्यांचे डॉक्टरही घेऊन जाऊन आवश्यक इंजेक्शन देण्यात आले. तसेच अन्न, पाणी देऊन उपचार करण्यात आले. योग्य वेळी मदत मिळाल्याने श्वानाचा जीव वाचवण्यात यश आले. तर दुसऱ्याच दिवशी कासा येथील भिसे नगर भागात असाच प्रकार घडला. यावेळी श्वानाच्या सहा पिल्लांपैकी हरवलेले एक पिल्लू घनदाट गवतामध्ये १२ ते १८ तास गवतामध्ये अडकून जिवाच्या आकांताने ओरडत होते. प्राणिमित्रांच्या मदतीचे त्या पिल्लाला शोधण्यात आले. यावेळी रात्री दहाच्या सुमारास प्राणिमित्रांनी घनदाट गवतामध्ये शोधमोहीम सुरू केली. हरवलेल्या पिल्लाची तिच्या आईसोबत एकत्र आले.
----------------------------------
कौतुकाची थाप
दोन्ही घटनांमध्ये प्राणिमित्र अंकित केनी, लतिष पुजारी, सतीश पुजारी, सनी गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरात साप निघाल्यास किंवा इतर प्राणी अडचणीत सापडल्यास प्राणिमित्र रात्री-अपरात्री धाव घेतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल कासा परिसरातून कौतुकाची थाप मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com