

गाव-पाड्यांत विजेचा लपंडाव
मोखाडा तालुक्यात विद्युत रोहित्रांची चोरी
मोखाडा, ता. ११ (बातमीदार) ः तालुक्यातील साखरी ग्रामपंचायत हद्दीतील बोरीचीवाडी विद्युत रोहित्राची चोरी झाली आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार परिसरात घडत असून चोरांमुळे गाव-पाड्यांवर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे.
मोखाडा तालुक्यात ट्रान्स्फॉर्मर चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. आठवडाभरापूर्वी खोडाळा परिसरातील धिंडेवाडीतही विद्युत रोहित्राची चोरी करण्यात आली होती. तर खोडाळा, कारेगाव, कडुचीवाडी येथेही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. चोरांकडून शिताफीने रोहित्र खाली उतरवून त्यातील तांब्याचे साहित्य चोरण्यात येते. त्यामुळे तांत्रिक माहिती असलेल्या भंगार माफियांचा सहभागाची शंका व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, महावितरण विभागाने पंचनामा करून बोरीचीवाडी तसेच दत्तनगर-मोरखडक गावपाड्यांना तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे; मात्र कमी दाबामुळे पाण्याची मोटार तसेच घरगुती विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
---------------------------
पोलिसांसमोर आव्हान
मोखाडा तालुक्यात विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे अट्टल चोरांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, मोखाडा पोलिसांसमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.