आक्षेपार्ह वक्तव्याने बोईसरमध्ये तणाव
आक्षेपार्ह वक्तव्याने बोईसरमध्ये तणाव
बोईसर, ता. ११ (वार्ताहर) : समाजमाध्यमावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
बोईसर येथील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या रूपेश झाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. संबंधित पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होताच शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम २९९, २९६, ६७, ३५२ आणि १६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आक्षेपार्ह पोस्ट किंवा समर्थन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

