

टेम्पोची क्षणार्धात राखरांगोळी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना
मनोर, ता. ११ ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खडकोना गावच्या हद्दीत बुधवारी पहाटे ४.३०च्या सुमारास आग लागल्याने टेम्पो खाक झाला. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या टेम्पोच्या इंजिनमधून धूर निघत असल्याने समजताच टेम्पोचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती; पण काही वेळातच टेम्पोने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. या वेळी तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तासाभरात घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत टेम्पोची राखरांगोळी झाली होती. या घटनेत टेम्पोचालक आसिफ हुसेन (वय ४२) सुरक्षित आहे. या वेळी क्रेनच्या साहाय्याने जळालेला टेम्पो महामार्गावरून हटवण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
--------------------------------------
आठवड्याभरातील दुसरी घटना
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आठवड्याभरापूर्वी मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग लागली होती. पालघरच्या सोमटा येथे ही घटना घडली होती. या वेळी गुजरात वाहिनीवर ट्रकने समोरील वाहनाला धडक दिल्याने चालक जवान सिंगचा (२८) जळून मृत्यू झाला होता, तर गुरुसेवक सिंग (३८) हा जखमी झाला होता. दोघेही पंजाब राज्याचे रहिवासी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.