डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती
डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती
सर्वेक्षण सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांची माहिती
पालघर, ता.११ ः डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कधी पूर्ण होणार, असा प्रश्न डॉ. सवरा यांनी संसदेत विचारला. त्याला उत्तर देताना डहाणू ते नाशिक मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू असल्याचे उत्तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. पश्चिम घाटातून जाणारा हा मार्ग अतिशय गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. पश्चिम घाटाची भौगोलिक परिस्थिती, त्यातील आव्हाने लक्षात घेता अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी सभागृहाला दिले. या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पामुळे पालघर, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
--------------------------
दिवंगत वनगा यांचे शर्थीचे प्रयत्न
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम भागांचा दळवळणाच्या माध्यमातून विकास व्हावा, आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी तत्कालीन दिवंगत खासदार वनगा यांनी केंद्रात शर्थीचे प्रयत्न केले होते. याच अनुषंगाने खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी हा मुद्दा पटलावर मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

