टिटवाळ्यात स्त्रीशक्तीचा जागर

टिटवाळ्यात स्त्रीशक्तीचा जागर

Published on

टिटवाळ्यात स्त्रीशक्तीचा जागर
कल्याण तालुका पोलिस ठाण्यात महिला दिन साजरा
टिटवाळा, ता. ११ (वार्ताहर): स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश देण्यासाठी कल्याण तालुका पोलिस ठाणे (मांडा-टिटवाळा) येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महिला व बालविकास विभाग आणि महिला विकास केंद्र संस्थेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात आरोग्य, कायदा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.

मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या वेळी पोलिस निरीक्षक पंकज गिरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे आणि पोलिस उपनिरीक्षक पूजा काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड यांनी महिलांचे समाजातील तसेच पोलिस दलातील महत्त्व अधोरेखित करत महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजघडणीत सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन त्यांनी केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे यांनीही महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सरकारी योजनांची माहिती देत प्रेरणादायी विचार मांडले. ॲड. नंदा जगताप यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना महिलांना अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला.

सामाजिक संस्थांचा सहभाग
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जागृती पाटील यांनी महिलांच्या आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वृक्षदीप वात्सल्य, स्वराज्य रणरागिनी, कर्तव्य महिला मंडळ, श्रमजीवी संघटना यांसह अनेक सामाजिक संस्था आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सांस्कृतिक रंगत
सुप्रिया आचरेकर यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात झाली. त्यानंतर प्रचीती भोसले आणि अक्षया भोईर यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली, तर लक्ष्मी अहिरे यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समुपदेशक हिराताई कांबळे यांनी सूत्रसंचालन व नियोजन केले. त्यांना स्वप्नील वहाणे, अनिता म्हात्रे, मदन शेलवले आणि रोशन विशे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com