४८ घरे फोडणारा सराईत चोरटा जेरबंद
४८ घरे फोडणारा सराईत चोरटा जेरबंद
एक कोटी ३९ लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंब्रा या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक नव्हे, तर तब्बल ४८ घरे फोडणाऱ्या टिटवाळ्यातील शिवाजी गोपाळ संते (वय ३१) या सराईत चोरट्याच्या ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून ४८ गुन्ह्यांतील एक कोटी ३९ लाख रुपये किमतीचे १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या उघडकीस आलेल्या गुन्ह्यांसह कल्याण आणि उल्हासनगर या पोलिस ठाण्यात यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. या ४८ घरफोड्या त्याने मागील दोन वर्षांत केल्याची कबुली दिली आहे, असे मंगळवारी (ता. १०) ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले.
दिवा पूर्व, मुंब्रा या परिसरात मागील दोन वर्षांपासून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाल्याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात तब्बल ४८ गुन्हे दाखल झाले असताना, त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता. या गुन्ह्यासंदर्भात पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड याचे पथक त्याच्या शोधात होते. त्यातच ८ फेब्रुवारी रोजी दिवा पूर्व, मुंब्रा येथे बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा व लॉक तोडून घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित आरोपीस गुन्हा घडला त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचे गुन्हे शाखा घटक १ चे पोलिस हवालदार संदीप महाडीक, पोलिस शिपाई प्रशांत लवटे, अमोल ढावरे आणि सागर सुरळकर यांनी निष्पन्न करत त्याला २ मार्च रोजी त्याला अटक केली असून, त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
अशी होती घरफोडीची पद्धत
आरोपी हा बंद घराच्या बाथरूमची व खिडक्यांची लोखंडी ग्रिल आणि मुख्य दरवाजाचे कडी- कोयंडा लोखंडी रॉडच्या सहाय्याने उचकटून घरफोडी चोरी करत होतो. दरम्यान, घटनास्थळावर येताना व गुन्हा करून परतताना तो प्रवासासाठी विविध साधनांचा वापर केल्याचे तसेच आपले अस्तित्व लपवण्यासाठी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात येणार नाही, यासाठी उलट्या दिशेने प्रवास करायचा, असेही पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

