कळव्यात रिक्षाला आग
कळव्यात रिक्षाला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे : कळवा येथील पारसिकनगरमधील रेतीबंदर सर्कल येथे पार्क केलेल्या रिक्षाला मंगळवारी (ता. १०) सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धाव घेत, त्या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आगीमुळे प्रवीण गुज्जर यांच्या मालकीच्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. या वेळी एक फायर व एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

