महिला किकबॉक्सिंग लीगमध्ये मुंबईच्या अश्विनीची दुहेरी सुवर्ण झेप; दर्शना सुवर्ण-रौप्य विजेती
अस्मिता खेलो इंडिया महिला किकबॉक्सिंग लीग
मुंबईच्या अश्विनीची दुहेरी सुवर्ण झेप
शिवडी, ता. १० (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अस्मिता खेलो इंडिया महिला किकबॉक्सिंग लीग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन-मुंबई सिटीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मुंबईचा झेंडा उंचावला. अश्विनी जांबळे हिने दमदार खेळाचे प्रदर्शन करत पॉइंट फाइट आणि लाइट कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारांमध्ये दोन सुवर्णपदके पटकावत दुहेरी यश संपादन केले, तर दर्शना आगगावणे हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत लाइट कॉन्टॅक्ट प्रकारात सुवर्णपदक आणि पॉइंट फाइट प्रकारात रौप्यपदक मिळवत स्पर्धेत आपली ठसठशीत छाप पाडली.
श्री हनुमान सेवा मंडळ हॉल येथे शितोर्यु स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन अंतर्गत या दोघी नियमित सराव करतात. प्रशिक्षक विन्स पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीनियर गटात खेळत त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेदरम्यान सामनाधिकारी विघ्नेश मुरकर यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले. या यशाचे श्रेय संघाचे प्रशिक्षक उमेश मुरकर, अध्यक्ष स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई सिटी व शितोर्यु स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन यांना दिले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

