

गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय
मोतीलाल ओसवालची रोखे सेवा सुरू
मुंबई, ता. ११ : गुंतवणूकदारांना स्थिर व नियमित उत्पन्नाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोतिलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंटने रोखे खरेदीसाठी विशेष वेबसाईट आणि ॲप बाजारात आणले आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे रोखे खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे.
रोख्यांमधून गुंतवणूकदारांना नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. ज्यांना गुंतवणुकीत स्थैर्य हवे आहे, तसेच मूळ भांडवल सुरक्षित राहावे असे वाटते, अशांसाठी रोखे खरेदी हा चांगला पर्याय मानला जातो. या पार्श्वभूमीवर रोख्यांच्या सामर्थ्याचा उपयोग करून गुंतवणूकदारांचे आर्थिक पोर्टफोलिओ अधिक सक्षम करणे, हा या सेवेचा उद्देश असल्याचे कंपनीने सांगितले.
या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदारांना सरकारी रोखे, सरकारी कंपन्यांचे रोखे तसेच खासगी कंपन्यांचे रोखे खरेदी करता येणार आहेत. याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणारे लाभही गुंतवणूकदारांना कायम राहतील.
दरम्यान, भारताचा रोखे बाजार हा जपान आणि चीननंतर आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा बाजार आहे. सध्या त्याचा आकार सुमारे तीन लाख कोटी डॉलर इतका असून तो साधारण भारताच्या जीडीपीएवढा असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय मेनन यांनी सांगितले; मात्र या मोठ्या बाजारात छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग अजूनही कमी असून त्यात वाढ होण्याची मोठी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.