कर्करोगाविरोधात आरपारचा लढा
कर्करोगाविरोधात आरपारचा लढा
मिरा-भाईंदरमध्ये किशोरवयीन मुलींचे लसीकरण
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : गर्भाशय, मुखाच्या कर्करोगाचे उच्चाटनाची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. याच अनुषंगाने मिरा-भाईंदर पालिकेने १४ ते १५ वयोगटातील मुलींना एचपीव्हीची लस देण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा महापौरांच्या हस्ते मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.
देशात महिलांच्या मृत्यूच्या विविध कारणांमध्ये गर्भाशय, मुखाचा कर्करोग आहे. सर्व प्रकरणे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) विषाणूच्या संसर्गामुळे होतात. या आजाराला वेळेवर लसीकरण करून प्रभावीपणे रोखता येते. केंद्र सरकारने किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लसीकरण करून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे उच्चाटनाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राज्यात ८ मार्चपासून ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत एचपीव्ही लस (गार्डासिल-४) सर्व शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, पालिका, शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत देण्यात येत आहे.
--------------------------------
लसीकरण सुरक्षित
एचपीव्ही लस जगभरात २० वर्षांपासून वापरली जाते. आतापर्यंत कोट्यवधी डोस देण्यात आले आहेत. लस सुरक्षित असल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून सिद्ध आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, चक्कर असे किरकोळ त्रास वगळता कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

