

महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन
कांदिवलीत महिला दिनानिमित्त प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, महिला नगरसेविकांचा सन्मान
कांदिवली, ता. ११ : जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास ट्रस्ट, भारत विकास परिषद (मालाड शाखा) आणि शिवकल्याण केंद्र सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १४४ महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच नव्याने निवडून आलेल्या महिला नगरसेविकांचाही सत्कार करण्यात आला.
कांदिवली पश्चिम येथील कमला विहार स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महापौरांच्या हस्ते सन्मान मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
महिला विकास ट्रस्टच्या अध्यक्षा क्रांती गिरकर-कुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मेहंदी प्रशिक्षण प्रकल्पाचे महापौरांनी कौतुक केले. कलेच्या माध्यमातून स्वयंरोजगार व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला माजी खासदार गोपाल शेट्टी, माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, श्रीराज नायर, एस. एस. गुप्ता, प्रभाग समिती अध्यक्षा लीना देहेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिनू गुप्ता, रेखा गोयल, जीत मिश्रा तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.