महिला कर्मचाऱ्यांना 
नऊ महिन्यांची प्रसुती रजा

महिला कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांची प्रसुती रजा

Published on

वाशी, ता. ११ (बातमीदार) : राज्य सरकारने महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा १८० दिवसांवरून गरज भासल्यास एक वर्षापर्यंत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती व पितृत्व रजेचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावामध्ये स्थायी समिती सदस्य स्वाती गुरखे यांनी सुधारणा करून १८० दिवस देण्यात येणारी प्रसूती रजा वाढवून एका वर्षाची करावी, अशी मागणी केली; पण स्थायी समितीमध्ये चर्चा झाल्यांनतर अखेर पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा नऊ महिन्यांची करण्याचा निर्णय घेण्यात आला; पण हा प्रस्ताव पालिका प्रशासन सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. सरकारच्या निर्णयानंतर या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९चे कलम ४६५(१) (क) व (ड) अन्वये रजा विनियमन प्रस्ताव कर्मचारी कार्यक्षमता, आरोग्य संरक्षण व प्रशासनीक सातत्य संतुलन राखण्याच्या हेतून स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या अनुषंगाने कमावलेली रजा, साधी रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती रजा, पितृत्व रजा, विशेष रजा, विनावेतन रजा, बालसंगोपन रजा अशा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रजेचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे चर्चेला आला. महिलांच्या प्रसूती रजेच्या प्रस्तावात १८० दिवसांऐवजी वाढीव स्थायी समिती सदस्य स्वाती गुरखे यांनी नऊ महिन्यांच्या करण्याच्या सूचनेला स्थायी समिती सदस्य अंजली वाळूंज यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार महिलांना प्राधान्य देत स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com